आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

नितीन देशपांडे   258   16-12-2025 20:56:22

Pune राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षातील ५ महत्त्वाच्या माजी नगरसेवकासह इच्छुक असणाऱ्या १५ जणांनी सोमवारी रात्री उशिरा पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा झालेली आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड अशा तीन शहरांची मिळून असलेल्या महापालिकेत मिरजेच्या वाट्याला २७ जागा आहेत. अजित पवारांची भेट घेतलेल्यां मध्ये मिरजेचे माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह त्यांचे पुत्र काँग्रेसचे माजी नगरसेवक करण जामदार, भाजपचे शिवाजी दुर्वे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, आरिफ चौधरी, जनसुराज्य पक्षाचे माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांच्यासह चंद्रकांत हुलवान, रमजान सतारमेकर, अंकुश कोळेकर आणि संतोष कोळी यांनी भेट घेतली. त्यांच्यासह आणखी १० ते १५ जणांनी देखील अजित पवारांची भेट घेतली.

दरम्यान या सर्वांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाल्यास काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. महायुतीमध्ये फोडाफोडी बंद असताना देखील घटक पक्षांमध्ये पक्षांतर सुरूच आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार १९ किंवा २० तारखेला मिरज दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी या सर्वांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सांगलीमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.