आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज रहा; साईनाथ बाबर

नितीन देशपांडे   120   16-12-2025 16:17:00

खडकवासला मतदारसंघात महापालिका निवडणुकीसाठी आढावा बैठक संपन्न!

धायरी -:  

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे प्रतिपादन शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी व्यक्त केले.

खडकवासला मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी धायरीतील मनसे नेते शिवाजीराव मते यांच्या जनसंपर्क कार्यालयात

आढावा बैठक संपन्न झाली.

 शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी प्रभागातील इच्छुक आणि मतदार यादीवर काम करणाऱ्या प्रतिनिधींना नेमण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष विजय मते यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, मतदारांपर्यंत पोहोचावे आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर लक्ष केंद्रित करावे असे मार्गदर्शन केले.

यावेळी  वाहतूक सेनेचे शिवाजीराव मते यांनी संघटनात्मक बांधणी कडे लक्ष वेधले. प्रत्येकाने प्रत्येक मतदारापर्यंत पोचून राज साहेबांचा विचार घरोघरी पोहोचवण्याची गरज निर्माण असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी खडकवासला विधानसभा अध्यक्ष विजय मते, वाहतुक सेना शहराध्यक्ष शिवाजीराव मते, शहर सचिव सोनाली पोकळे, चंद्रकांत गोगाले, गौरव दांगट, नितीन वांजळे, आकाश साळुंखे, गणेश सुर्यवंशी, विजय इंगळे, सिद्धार्थ पोकळे, बाळासाहेब हाणमघर, राहुल वाळुंजकर, अभिजीत देशमुख, रियाज शेख, गणेश धुमाळ, समीर वेदपाठक, वैभव जाधव, सतीश कोळेकर, प्रशांत पवार, सचिन कोरे, बाळासाहेब मंडलिक, नयन धोत्रे, हर्षल रायकर, स्वप्नील नांगरे, राज बडदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत प्रभागातील कामकाजाचे नियोजन, कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याचे आणि आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे मुद्दे चर्चिले गेले. सर्व उपस्थितांनी नागरिकांशी सतत संवाद साधून पक्षाच्या उद्दिष्टांची माहिती देणे आणि मतदारसंघात सक्रिय उपस्थिती राखणे आवश्यक असल्याचे मान्य केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण सर्वांनी सज्ज व्हावे व आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही मत साईनाथ बाबर यांनी यावेळी व्यक्त केले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.