आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Beed बीडच्या जेलमध्ये प्रतिक घुलेंची गुंडगिरी सुरूच

नितीन देशपांडे   194   16-12-2025 09:10:49

Beed News 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण झालं आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडसह इतर आरोपी बीडच्या जेलमध्ये मुक्कामी आहे. अशातच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी प्रतीक घुले याने थेट कारागृहातील कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे.

बाहेर आल्यावर तुला बघतो' अशी धमकी घुलेनं दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांच्या प्रतीक घुले धमकी दिल्याचा आरोप केला आहे. प्रतिक घुले हा बीड जिल्हा कारागृहात असून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे. 'या आरोपींना पश्चाताप नसून पराक्रम केल्याची भावना आहे. आरोपी हा सुटून आल्यानंतर तुझं बघतो, अशी धमकी कर्मचाऱ्याला दिली आहे.

'या प्रकरणी कारागृह अधिक्षकांनी काही कारवाई करावी, जर कारागृह अधिक्षक यांनी कारवाई न केल्यास साडी चोळी भेट देऊ, असा इशाराच स्वप्निल गलधर यांनी दिला. तसंच, मकोकामधील आरोपींना दुसऱ्या कारागृहात पाठवण्याच्या आदेश असताना इथं का ठेवले जात आहे, असा सवालच उपस्थित केला. तसंच, कारागृहामध्ये वाल्मिक कराड मोबाईल वापरतो. मोबाईल रिचार्ज करतो, असा दावाही त्यांनी केला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.