आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सामाजिक संस्थांच्या कार्यप्रणालीमुळे राष्ट्र घडण्यास मदत होते - मेधाताई कुलकर्णी

शरद लाटे  225   16-12-2025 00:04:25

सामाजिक संस्थांच्या कार्यप्रणालीमुळे राष्ट्र घडण्यास मदत होते - मेधाताई कुलकर्णी

कीर्ती शक्ती सामाजिक संस्थेचा शुभारंभ संपन्न

Pune news - पुणे शहरातील बाणेर येथे कीर्ती शक्ती फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या शुभारंभ आज करण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संघाचालक रवींद्र वंजारवडकर, राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी बाणेर मेडिकल असोसिएशनचे राजेश देशपांडे, माजी नगरसेवक श्री अमोल बालवडकर, माजी कोथरूड अध्यक्ष श्री प्रकाश बालवडकर, माजी नगरसेविका सौ अर्चनाताई मुसळे, काँग्रेस पक्षाचे श्री जीवन चाकणकर, श्री अमरजी लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) माजी नगरसेवक श्री बाबुराव अप्पा चांदेरे, श्री समीर चांदेरे, श्री राहुल दादा बालवडकर , सौ ज्योतिताई बालवडकर, श्री संजय ताम्हाणे, श्री विशाल विधाते, भाजप चे  कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष श्री लहू बालवडकर, श्री विशाल गांधीले, श्री प्रकाश तापकीर श्री संतोष तापकीर, श्री शिवम बालवडकर, श्री राहुलदादा कोकाटे, श्री उत्तम जाधव, श्री सुभाष भोळ, श्री गणेश कळमकर, माजी नगरसेविका सौ ज्योती कळमकर, माजी नगरसेविका सौ स्वप्नाली सायकल, श्री प्रल्हाद सायकर , श्री ओंकार शेडजाळे, डॉ मनिषा जाधव,   मनसे पक्षाचे श्री अनिकेत मुरकुटे, योगीराज पतसंस्थेचे श्री ज्ञानेश्वर तापकीर, विद्यांचल हायस्कूल चे श्री अशोक जी मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे श्री जयेश मुरकुटे उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या संस्थापक कल्याणी टोकेकर, बिरजेश राय, शिखा निखरा यांनी संस्थेच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कल्याणी टोकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य संकलन करण्यात आले होते यामधील लोकसमूहातून धान्य गोळा करण्यात आले,

खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी कल्याणी ताईंचे कौतुक करत सामाजिक संस्था मुळे राजकीय व दैनंदिन कामाला खूप मोठी मदत होते असे उद्गार यावेळी त्यांनी व्यक्त केले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.