शेवाळवाडी गावाचा कायापालट होणार; स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्यमंत्र्यांकडून राहुल शेवाळेंवर कौतुकाची थाप
स्वारगेट प्रतिनिधी -: शहराच्या दीर्घकालीन हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह पुणे महापालिकेच्या वतीने आखलेल्या सुमारे 3 हजार 63 कोटी रुपयांच्या विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि.15) एकाच वेळी पायाभरणी होत आहे. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते विकास, आरोग्य, शालेय शिक्षण, सुशासन या विभागांचा समावेश आहे यावेळी पुणे महानगरपालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेवाळेवाडी गावाला सुमारे ३७ कोटी रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना होत आहे त्याचे ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले.
या पाणी योजनेमुळे शेवाळवाडीकरांना 24 /7 मिळणार आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, हडपसर चे आमदार चेतन तुपे पाटील, पुणे महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर , पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, बी.पी पृथ्वीराज तसेच शेवाळेवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमा राहुल शेवाळे, माजी उपसरपंच राहुल शेवाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
राहुल शेवाळे व माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या मागणीला यश
गेल्या काही दिवसांपूर्वीच महापालिकेत समाविष्ट झालेल्या शेवाळवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात शेवाळवाडी गावच्या सरपंच प्रतिमाताई शेवाळे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस व गावचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवला होता.
गावच्या पाणीप्रश्नाबाबत विशेष दखल घेऊन महापालिका आयुक्तांना कार्यवाही करण्याची सूचना केली होती अखेर त्यांना मोठे यश आले आहे यामुळे नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त केले.