Pune बाणेर : पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच घटक पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची समन्वय बैठक बाणेर येथे पार पडली.
यावेळी माजी नगरसेवक तानाजी निम्हण, संदीप बालवडकर, जयेश मुरकुटे, महेश सुतार, ज्योती चांदेरे, माजी सरपंच मयूर भांडे, अशोक दळवी, जीवन चाकणकर, अमर लोंढे, मयूर सुतार, अनिकेत मुरकुटे, दत्ताभाऊ जाधव, मंगेश निम्हण, रितेश पाडाळे, विनायक गायकवाड, अमोल फाले, करण कांबळे, सुरज चोरमले, ओम बांगर, शिवम दळवी, मधुसूदन पाडाळे, पंकज खटाने, रोहित धेंडे, कोळेकर आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ९ सूस बाणेर पाषाण मधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रत्येक गावामध्ये महाविकास आघाडीच्या कामांचा आढावा घेतला. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा पक्षासमोर एकजुटीने मोठे आवाहन निर्माण करण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
चार पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित आल्याने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महाविकास आघाडीची राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समीकरणे निर्माण झाले आहेत. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी समजली जाणारी लढत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
भाजपाप्रमाणेच महाविकास आघाडीत देखील मोठ्या प्रमाणात इच्छुकांची यादी वाढल्याने चार पक्षांमध्ये उमेदवारी कशी दिली जाणार याकडे लक्ष वेधले आहे. महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सातत्याने होत असलेल्या एकत्रित बैठका यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील राजकीय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.