आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं! 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात, 15 जानेवारीला मतदान, 16 तारखेला निकाल

शरद लाटे  132   15-12-2025 16:48:35

Pune 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम

  • नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी: 23 - 30 डिसेंबर 2025
  • नामनिर्देशन पत्रांची छाननी : 31 डिसेंबर 2025
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026
  • निवडणूक चिन्ह वाटप : 3 जानेवारी 2026
  • अंतिम उमेदवाराची यादी : 3 जानेवारी 2026
  • मतदानाची तारीख : 15 जानेवारी 2026
  • मतमोजणीची तारीख : 16 जानेवारी 2026

महानगर पालिका निवडणुकांची आकडेवारी

  • एकूण 29 महानगरपालिका निवडणूक जाहीर
  • एकूण 2869 जागांसाठी निवडणूक
  • महिला - 1442
  • अनुसुचित जाती - 341
  • अनुसुचित जमाती - 77
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग - 759

दोन नवनिर्मित महानगरपालिकांचा समावेश

राज्यातील महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकां जाहीर झाल्या आहेत. यात मुदत संपलेल्या 27 महानगर पालिकांचा समावेश आहे, तर जालना आणि इचलकरंची या दोन नवनिर्मित महानगर पालिका आहेत. मुंबई महानगर पालिकेत 1 सदस्यीय प्रभाग आहे, प्रत्येक मतदाराला एक मत द्यावे लागेल. इतर महानगर पालिकांमध्ये एका प्रभागातून तीन ते पाच उमेदवार निवडून द्यावे लागतील. त्यामुळे मतदारांना तीन ते पाच मतदान करावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर

मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी त्या देखील 31 जानेवारीच्या आधी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.