Pune news
पिंपरी-चिंचवड महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. ग्रामविकास विभागाकडील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश नगरविकास विभागाच्या प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी काढला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यात दोन प्रतिनियुक्तीने आणि एक स्थानिक अधिकाऱ्यांमधील एक अशी विभागणी आहे. राज्य सेवेतील नियोजन विभागातील प्रदीप जांभळे-पाटील यांची महापालिकेतील प्रतिनियुक्ती ३१ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आणली. त्यांची सेवा मूळ वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली.
राज्य शासनाने ठाकूर यांच्याऐवजी ग्रामविकास विभागाकडील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे.
महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळेना
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची सात ऑक्टोबर राेजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली. त्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार दिला. महापालिका निवडणूक होईपर्यंत हर्डीकर यांच्याकडेच पदभार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळण्याचे संकेत आहेत.