आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा

नितीन देशपांडे   88   14-12-2025 20:33:21

Pune 

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणता नेता विराजमान होणार, याची देशभरात चर्चा सुरू आहे. पक्षाचे नेते, पदाधिकारी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा धक्का दिला आहे.

भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेण्यात आला असून ४५ वर्षांच्या नितीन नबीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. नबीन हे सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत. पक्षाला बिहारमध्ये नुकताच ऐतिहासिक विजय मिळाला आहे. त्यामुळे या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. बिहारसह राष्ट्रीय राजकारणात याकडे एक रणनीती म्हणून पाहिले जात आहे.

नितीन नबीन यांचा संघटनात्मक अनुभव, तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी असलेले संबंध, प्रशासकीय क्षमतेमुळे त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही नियुक्ती १४ डिसेंबरपासून तत्काळ प्रभावाने लागू होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी अरूण सिंह यांनी हा आदेश जारी केला आहे.

अरूण सिंह यांच्या आदेशानुसार, ही नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बोर्डाद्वारे करण्यात आली आहे. नितीन नबीन हे नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये रस्ते विकास मंत्री आहेत. पटनातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते यावेळी चौथ्यांदा निवडून आले आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.