आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

जवळ ठेवा हे डॉक्युमेंट; टोल पैसे वाचणार सर्वसामान्यांना मोठा दिलासा

नितीन देशपांडे   55   14-12-2025 12:52:28

Toll news 

भारतातील रस्त्यांवर दररोज लाखो वाहने जातात, ज्यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. या महामार्गांवर असंख्य टोल प्लाझा आहेत, ज्यामुळे सर्व वाहनांना टोल भरावा लागतो.

दरम्यान, जर तुमच्या घराजवळच टोल प्लाझा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या घराजवळील २० किलोमीटरच्या आतील टोल प्लाझावर तुम्हाला टोल द्यावा लागत नाही. तुम्हाला प्रवासादरम्यान कोणतेही पैसे मोजावे लागत नाही. NHAI च्या या नियमामुळे टोल प्लाझाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना फायदा होणार आहे. त्यांना आता रोजच्या प्रवासासाठी टोल भरावा लागणार नाहीये.

काय आहे नियम? (What is Toll Rule)

नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियानुसार, ज्या वाहनधारकाचे घर कोणत्याही टोल प्लाझा असलेल्या २० किलोमीटरच्या क्षेत्रात असले त्यांना तो टोल भरावा लागत नाही. यासाठी वाहनधारकाकडे आधार कार्ड, वीजबिल किंवा रेशन कार्ड असा पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. हा पुरावा दाखवून तुम्ही त्या ठिकाणच्या टोल प्लाझावरुन मोफत प्रवास करु शकतात.

फायदा कसा मिळणार?

तुम्हाला तुमच्या जवळच्या टोल प्लाझावर जायचे आहे. तिथे तुम्हाला पत्त्याचा पुरावा दाखवायचा आहे. यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लोकल पास दिला जातो. यामुळे रोज या मार्गावरुन प्रवास केल्यावर तुम्हाला कोणताही टोल भरावा लागत नाही.

हिवाळी अधिवेशनादरम्यान या विषयावर चर्चा करताना, नार्वेकर यांनी पुढील आठ दिवसांत राज्यातील एकाही ई-वाहनाकडून टोल वसूल केला जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, धोरण लागू झाल्यापासून (ऑगस्ट २०२५ पासून) वसूल केलेला टोल वाहनधारकांना परत देण्याची यंत्रणा तत्काळ सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. (Maharastra EV Toll Policy)


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.