Pune
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
२९ मनपाच्या निवडणुका आता एकाच टप्पात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोमवारनंतर कधीही याची घोषणा होऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत आयोग यासंदर्भातील घोषणा करण्याची शक्यता आहे. १५ तारखेनंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे १२ जानेवारीनंतर मतदान आणि दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो, अशी माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.
दुसरीकडेकाही महापालिका अशा आहेत, जिथे ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. यात नागपूर आणि चंद्रपूर या मनपांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होतील की नाही, अशी शंका होती. मात्र, आता ठिकाणी देखील निवडणुका होतील, अशी सुत्रांची माहिती आहे. सर्वोच्च न्या२९ मनपाच्या निवडणुका आता एकाच टप्पात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोमवारनंतर कधीही याची घोषणा होऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.