पक्ष फुटीच्या निकालाबाबत कोर्टात काय घडले? माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट सांगितले. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी झी 24 तासच्या टु द पॉइंट कार्यक्रमात मांडली. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी भूषण गवई यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अेनक प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली. .
शिवसेना फुटली, आमदार फुटले या प्रकरणावर अद्याप कोर्टाने निकाल दिलेला नाही. यामुळे अशा प्रकरणांमध्ये दिरंगाई होते असा आरोप केला जातो. असा प्रश्न भूषण गवई यांना विचारण्यात आला. भूषण गवई महाराष्ट्राच्या पक्ष फुटीच्या निकालाबाबत स्पष्ट मत मांडले. मात्र, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आपल्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आले नव्हते यामुळे या प्रश्नावर काहीच भाष्य करणार नाही असे गवई म्हणाले. कोर्टाने अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये ठराविक कालावधीत हा निर्णय घ्यावा. असे निर्देश दिले जातात असे भूषण गवई यांनी स्पष्ट केले. न्याव्यवस्थेववर सत्ताधाऱ्यांचा अंकुश असतो असा अरोप केला जातो. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचे गवई म्हणाले.
राजकारणात येण्याचा सध्या कोणताही विचार नसला तरी भविष्यात नियतीच्या मनात काही असेल तर सांगता येत नाही असं निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंनी सांगितलंय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी भविष्यातल्या वाटचालीवर भाष्य केलं. काही सामाजिक मुद्यांवर काम करण्यास आपण प्राधान्य़ देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच एका याचिकेवर निवाडा करताना भगवान विष्णूंबाबत केलेलं वक्तव्य करायला नको होतं असं त्यांनी म्हटलंय. आपण जे बोललो त्याचा वेगळा अन्वयार्थ लावण्यात आल्याचंही ते म्हणाले. पण झालेल्या वादानंतर आपण पुढच्या काळात निवाड्यावेळी टिपण्णी करताना अधिक सजग झाल्याचंही त्यांनी सांगितलंय.