आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 धुळे

Breaking News: राज्य सरकार आता गुटखा विकल्यास थेट 'मकोका' लागणार?

शरद लाटे  237   19-11-2025 17:22:28

Pune 

राज्य सरकार गुटख्याची विक्री पूर्णपणे रोखण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का लागू करण्याचा विचार करत आहे.

महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक आणि विक्रीचे प्रकार सतत समोर येत आहेत. यामुळे गुटखा बंदी प्रभावी पद्धतीने अंमलात येत नाही, अशी परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर मोक्का लागू करण्यासंबंधी मार्गदर्शन मागणारा प्रस्ताव कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत झिरवाल यांनी सांगितले की राज्य सरकार गुटखा बंदीची अंमलबजावणी आणखी कडक करणार आहे. विविध विभागांना जिल्हा पातळीवर जागरूकता मोहिमा राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांबद्दल नागरिकांना जास्तीत जास्त माहिती देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.