आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नांदेड

राजन पाटलांची सूनच होणार बिनविरोध नगराध्यक्ष? काय घडलं नेमके

शरद लाटे  428   18-11-2025 19:10:12

काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राचे लक्ष वेधले. कारण, मोहोळ (solapur) तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, आज (ता. 18 नोव्हेंबर) झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला होता.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.