आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

सुस गावातील महादेव नगरकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात

शरद लाटे  591   16-10-2025 21:19:41

नागरिकांनी मानले माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आभार

बाणेर प्रतिनिधी Pune update - : सुस येथील पारथे वस्ती कडून महादेवनगर कडे जाणाऱ्या वीस फूट रुंद व 100 मीटर लांबीच्या  रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली, अनेक दिवसापासून हा रस्ता प्रलंबित होता

 त्यामुळे अनेक नागरिकांना रहिवाशांना ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जावे लागत होते, तासंतास ट्राफिकच्या समस्येतून आता सुसकर लवकरच ट्रॅफिकच्या समस्यातून सुटणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी प्रशासनाकडे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे अनेकदा मागणी केली होती त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला सूचना देत रस्त्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली यामुळे नागरिकांनी बाबुराव चांदेरे यांचे आभार मानले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.