आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पिंपरी चिंचवड प्रभागरचनेच्या विरोधात ॲड. सचिन भोसले यांची हायकोर्टात धाव..!

नितीन देशपांडे   77   08-10-2025 20:46:34

Pune पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रचना जाहीर झाली, त्यानुसार हरकती नोंदवण्यात आल्यानंतर अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिली. काही ठिकाणी प्रभाग जसेच्या तसे ठेवले. परंतु प्रभाग क्रमांक २४ डांगे चौक, गणेशनगर, थेरगाव या प्रभागात वाकड मधील म्हातोबा झोपडपट्टीचा समावेश होता. याठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण पडू नये यासाठी या म्हातोबा झोपडपट्टीचा समावेश प्रभाग क्रमांक २५ मध्ये केला असून राजकीय सुडापोटी हा बदल करण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केले असून या विरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असूनही, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मतदारसंख्या कमी करण्याचा आणि प्रभागाच्या सीमारेषांमध्ये फेरबदल करण्याचा प्रकार जाणूनबुजून केला आहे. या बदलांमुळे त्या प्रभागातील समाजाच्या प्रतिनिधित्वावर परिणाम झाला असून, अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या प्रभागाचा मूळ हेतूच डावलला गेला आहे. हा निर्णय पूर्णपणे राजकीय सुडबुद्धीने घेतला असल्याचा आ सचिन भोसले यांनी पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभागरचनेच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव राहिला आहे. राजकीय दबावाखाली विशिष्ट पक्षांना लाभ होईल अशा पद्धतीने प्रभागरचना करण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये देखील तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

 
 
 
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी अन्यायकारक प्रभागरचनेविरोधात न्याय आणि सत्याच्या बाजूने उभे राहत हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली आहे. या याचिकेद्वारे प्रभाग क्रमांक २४ मधील संबंधित आकडेवारीचा तपशील सादर करून अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा हेतू अबाधित राहण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
 
 
 
ॲड. भोसले यांनी पुढे म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २४ हा अगोदरच अनुसूचित जातीसाठी राखीव असताना देखील त्या प्रभागात अनुसूचित जातीची मतदार संख्या तिकडे वळवण्यात आली. प्रभागरचनेत बदल करण्याचे अधिकारी नसताना देखील हस्तक्षेप करून जाणीवपूर्वक आणि राजकीय सूडबुद्धीने हा प्रकार केला आहे. याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. संविधानाने निवडणूक लढवण्याचा अधिकार आणि हक्क दिला आहे, त्यानुसार कितीही कटकारस्थान केले तरी मी निवडणूक लढविणारच या भूमिकेवर ठाम आहे. २०१७ साली प्रभागातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आणि त्यांच्या देखील विश्वासाला तडा मी जावू दिला नाही. यावेळी देखील जनता माझ्यावर विश्वास ठेवून निवडणुकीत आशीर्वाद देतील असा विश्वास ॲड. सचिन भोसले यांनी व्यक्त केला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.