Pune
नवले पुलाजवळ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोरात धडक दिली.त्या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.तर त्या रिक्षाचालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासातसमोर आली.
ज्यानंतर गौतमीला अटक करण्याची मागणी होते आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यासंदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला होता. तसंच गौतमीला ट्रोलही केलं जातं आहे. ज्यानंतर गौतमीने आता माध्यमांसमोर येत तिची बाजू मांडली आहे. तसंच आपण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही असंही तिने सांगितलं आहे. यावेळी गौतमीला अश्रू अनावर झाले होते.
*मदत पाठवली मात्र त्यांना वेगळे सागितले*
रिक्षावाल्यांच्या कुटुंबीयांना मदतही पाठवली. मात्र त्यांच्याकडून मदत नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं की जे काही चाललं ते आपण कायदेशीर करु. म्हणून मग आता कायदेशीर मार्गाने जर सगळं होऊ देत असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. मी गरीब घरातूनच आलेली मुलगी आहे. माझ्याकडून मदत पाठवली होती. पण त्यांनी ती मदत नाकारली. पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला त्यानंतर दुपारी माझं बोलणं झालं होतं. मात्र त्यांनी मदत नाकारली, कायदेशीर सगळं करु असं सांगितलं त्यामुळे मी गप्प बसले. पण नंतर कुणी काहीही बोलतं आहे. ज्याला काहीच अर्थ नाही असंही गौतमीने सांगितलं.