Pune News
सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) भरीव निधी देण्यासंदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेजही जाहीर केले आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट धारकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, एसआरएमध्येक्लस्टर योजना राबविण्यासाठी मंजूरी दिल्याने मुंबईतील झोपडपट्टीवासींनाही मोठा दिलासा मिळणार आहे. यासह, उद्योग, नगरविकास, महसूल व गृहनिर्माण विभागानेही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 9 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
(उद्योग विभाग)
महाराष्ट्र राज्याचे रत्ने व दागिने धोरण - २०२५ जाहीर. सोने, चांदीचे दागिने,हिरे-रत्ने यांच्याशी निगडीत उद्योग-व्यवसाय वाढीस चालना मिळणार. एक लाख कोटींरुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितेचउद्दीष्ट.
(नगर विकास विभाग)
राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे धोरण. सांडपाण्यावरील प्रक्रीयेमुळे आणि त्याच्या पुनर्वापराव्दारेचक्रीय अर्थव्यवस्थेस (सर्क्युलरईकॉनॉमी)ला चालना. सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, आरोग्यदायी परिसर या संकल्पनेला बळ मिळणार. राज्यातील ४२४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये धोरण राबविण्यात येणार
(महसूल विभाग)
तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मध्ये सुधारणा करण्यात येणार. अधिनियमातील कलम ८ (ब) चेपरंतुकवगळूनकलम ९ मध्ये पोट-कलम (३) नंतर पंरतुक समाविष्ट करण्यात येणार.
(गृहनिर्माण विभाग)
मुंबईत झोपडपट्टी पुनवर्सनप्राधिकरण (एसआरए) अंतर्गत झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना (SlumClusterRedevelopmentScheme) राबविणार.
(महसूल विभाग)
अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृतपी.एम.ई बस योजनेअंतर्गत ई-बस डेपो व चार्जींगव्यवस्थेकरिता मौजा बडनेरा येथील २ हेक्टर ३८ आर जमीन ३० वर्षासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
स्वयंसेवीसंस्थांद्वारेचालविण्यातयेणाऱ्याविजाभजप्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक निवासी आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतनआश्रमशाळांतीलशिक्षकेत्तरकर्मचाऱ्यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय. अशा ९८० आश्रमशाळातीलशिक्षकेतरकर्मचाऱ्यांना लाभ मिळणार.
(वस्त्रोद्योग विभाग)
खासगी सूतगिरण्यांनाएकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ अंतर्गत सहकारी सूतगिरण्यांप्रमाणेयुनीट मागे ३ रुपये वीज अनुदान सवलत लागू करण्याचा निर्णय. राज्य औद्योगिक समुह विकास योजनेंतर्गतक्लस्टरमधीलसुतगिरण्यांना दिलासा मिळणार.
(वस्त्रोद्योग विभाग).
यंत्रमागधारकांना वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योगआयुक्तालयाच्यापोर्टलवर नोंदणी करावी लागणार. शासन निर्णय जारी झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत नोंदणी करावी लागणार.