आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 भंडारा

बांधकाम कामगारांच्या आरोग्याला महामंडळाचे बळ, २ लाखांपर्यंत मोफत

नितीन देशपांडे   111   29-09-2025 13:18:43

Pune 

 

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून मोठा दिलासा देण्याचे काम होत आहे.

 

नोंदीत कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणाऱ्या ३५ पेक्षा अधिक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाकडूणन सुमारे २ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उलब्ध होणार आहे. याचा लाभ२,३४,६५० कामगार व त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे.

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना गंभीर आजार आणि प्रसूतीसाठी आर्थिक मदतीचा महत्त्वपूर्ण लाभ दिला जातो. यात महिला कामगारांना प्रसूतीच्या वेळेस आर्थिक मदत दिली जाते. नोंदणीकृत कामगारांना कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही योजना कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

 

-अ. मा. जाधव, कार्यालयीन प्रमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळनोंदणी प्रक्रिया सुलभ केली असून, कामगारांनी पुढे येऊन या संधींचा लाभ घ्यावा. तालुकास्तरावर सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २,३४,६५० नोंदणीकृत कामगार आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.