आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार

नितीन देशपांडे   161   22-08-2025 17:19:22

पुणे- 

महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते जवळपास पाच ते सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेत. आता अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

पुण्यामध्ये भरल्या ४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनामध्ये राज्यासह देशातील नेत्यांचे भविष्य वर्तवण्यात आले. 'नरेंद्र मोदी हे पावरफुल आहेत. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेऊ नये. राज ठाकरे यांचं काही होणार नाही. देवेंद्र फडणवीस हे पुढे मोठ्या पदावर जातील.', अशा प्रकारचे भाकित या संमेलनामध्ये ज्योतिषांनी वर्तवले. त्यांनी सांगितलेल्या भाकितामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.

ज्योतिषांनी सांगितले की, 'पीएम मोदी यांची पत्रिका एवढी मजबूत होती की त्यांनी सगळा भारत कॅप्चर केला आहे. त्यांची पत्रिका खूपच मजबूत आहे. पुढील काही वर्षांत मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि ते अज्ञातवासात जातील.' देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ज्योतिषांनी सांगितले की, 'देवेंद्र फडणवीस हे एक 'लंबी रेस का घोडा' असून ते दिल्लीकडे वाटचाल करतील. दिल्लीत ते मोठ्या पदावर काम करतील.

तर, 'अजित पवारांची संघर्षाची पत्रिका आहे. अजित पवार त्यांना खूप संघर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळेल.', असंही भाकित ज्योतिषांनी दिले. तसंच, 'उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नये. त्यांच्यासाठी कठीण काळ असला तरी, राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील.', असे ज्योतिष म्हणाले.

माझा कार्यकर्ता कुठल्याही कार्यालयात गेला तरी तो अजित पवारांचे काम घेऊन आला असे अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवले आहे. मात्र, हे सांगताना त्यांनी पुन्हा वैयक्तिक कामे होणार नाही, असेही सर्वांना बजावले. मी ३५ वर्षांपासून राजकारणात आहे आणि कामे करतो. प्रत्येक वेळी सत्तेत होतोच असेही नाही. मात्र, आपण अधिकाऱ्यांसोबत कसे संबंध ठेवतो, यावरही बरेच काही अवलंबून असते, असेही अजित पवार म्हणाले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.