आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

नव्या उमेदवारांना नोकरीची संधी! पुरवठा विभागात नवे २६ लिपिक येणार !- District Supply Officer Bharti

शरद लाटे  283   13-08-2025 10:57:45

पुणे- 

पुरवठा विभागातील गेल्या दोन वर्षांपासून असलेली लिपिक पदांची कमतरता लवकरच संपणार असून पुरवठा विभागाला २६ नवीन लिपिक टंकलेखक येत्या महिनाभरात मिळणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी येत्या १३ व १४ ऑगस्ट रोजी होणार आहे

सर्वजण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पदभार स्वीकारतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हापुरवठा विभागात ४६ मंजूर पदांपैकी केवळ ३ लिपिक कार्यरत होते. त्यामुळे अव्वल कारकुनांवर जादा भार पडत होता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा पुरवठा कार्यालयात लिपिकांची ४६ पदे मंजूर आहेत. मात्र २०२२ पासून यातील ४३ पदे रिक्त होती. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधात विभागाने २६ पदांची मागणी केली होती. हीच स्थिती अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातही होती. यासाठी या कार्यालयाने ३ जणांची मागणी केली होती. राज्य लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०२३ मध्ये गट- क सेवेमधून १ हजार ८९ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या विरोधात काही जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामुळे अंतिम निकाल रखडला आणि भरती प्रक्रियेला विलंब झाला. त्यानंतर न्यायलयाने याबाबत निकाल दिल्यानंतर आयोगाच्या वतीने ११ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग व शहर पुरवठा विभागाला २६ लिपिक मिळणार आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजात गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पात्र ठरलेल्या या सर्व उमेदवारांना जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने १३ व १४ ऑगस्ट रोजी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलाविले आहे.

अन्य महत्वाच्या भरती

पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयासाठी १३३ आणि शहर अन्नधान्य वितरण कार्यालयासाठी ७६ अशी पुणे जिल्ह्याकरिता २०९ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी तब्बल ११० पदे रिक्त असल्याची कबुली राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळात दिली. विधिमंडळ अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, की पुणे जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना मिळून एकूण नऊ लाख ६१ हजार २८२ शिधापत्रिकाधारक आहेत. खात्याच्या आकृतिबंधाबाबत शासन शुद्धिपत्रक १५ डिसेंबर २०२२ नुसार जिल्हा पुरवठा कार्यालय, पुणेसाठी १३३, शहर अन्नधान्य वितरण कार्यालयासाठी ७६ अशी मिळून पुणे जिल्ह्यासाठी २०९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत जिल्हा पुरवठा कार्यालय पुणे येथे ५९, अन्नधान्य वितरण कार्यालय येथे ४० असे ९९ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. पुरवठा विभागाची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आणि मंजूर पदांपेक्षा प्रत्यक्षात कमी पदे भरल्याची बाब अंशतः खरी आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.