आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

निखिल बोऱ्हाडे यांच्याकडून 50 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्त

नितीन देशपांडे   51   13-08-2025 09:07:01

भोसरी प्रतिनिधी (Bhosari Chief Ministers Relief Fund) भारतीय जनता पार्टीचे मोशी येथील कार्यकर्ते निखिलदादा बोऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला पन्नास हजार रुपये निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता व धर्मादाय रुग्णालयाचे मदत कक्ष प्रमुख डॉ. मानसिंग साबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, यावेळी समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक समर्थ सुरवसे, पुणे जिल्हा समन्वयक अमित जागडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, गंभीर आजार किंवा संकटग्रस्त परिस्थितीत असलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्यासाठी केला जातो. 

निखिलदादा बोऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी परिसरात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले, रक्तदान शिबिर, सफाई कामगारांचा सन्मान, विविध समाज उपयोगी व्याख्याने, विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य, अशा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला,

सामाजिक बांधिलकी जपत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजार रुपयाची मदत दिली. त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमातून "समाजासाठी काहीतरी करावं" या भावनेतून प्रेरित होऊन इतरांनीही अशा प्रकारे मदतीस पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.