पुणे (Pune news update) महानगरपालिका हद्दीतील गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकामधारकांना थेट 31 डिसेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते राहुल पोकळे यांनी पालिका प्रशासनावर सळसळून टीका केली यावेळी ते म्हणाले की एकतर दस्त नोंदणी सुरू करा अन्यथा किचकट गुंठेवारी सोपी करा,
गुंठेवारीमध्ये जाचक अटी टाकल्यामुळे गुंठेवारी करणे सोपे राहिले नाही त्यामुळे गुंठेवारीतील तरतूद सोपी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते तथा शासन नियुक्त नगरसेवक राहुल पोकळे यांनी केली आहे.
शेती ना विकास झोन मधील बांधकामे नियमित करायला हवेत; दस्त नोंदणी सुरू नसल्यामुळे देखील लाखो नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे असे देखील ते म्हणाले.