मोशी प्रतिनिधी - (Pimpri-Chinchwad) टाळगाव चिखली येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी टाळगाव चिखली येथे पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड युवा मंच यांच्या वतीने भव्य स्वरूपात केलेले आहे, या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत.
सिने अभिनेता कीर्ती खरबंदा, झेबा शेख, मयुरी उत्तेकर, पोर्णिमा डे, या उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक माजी नगरसेवक कुंदन गायकवाड व पैलवान संदीप शेलार व युवा मंचच्या वतीने दिली गेली आहे.