आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Beed बीड जिल्ह्यातील पहिले संविधान साक्षर गाव होणार

नितीन देशपांडे   73   12-08-2025 19:51:37

Beed News (बीड) कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर कासार येथील लोकप्रशासन शास्त्र व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "एक गाव संविधान साक्षर अभियान" दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी कान्होबाचीवाडी तालुका शिरूर कासार येथे सकाळी 9.30 वाजता राबविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये गावातील शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे, उपप्राचार्य संजय तुपे, त्याच बरोबर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मिसाळ सर , हे होते. याप्रसंगी  वारे सर, तांबे सर, सानप सर, व त्या ठिकाणचा सर्व स्टाफ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुजाता येवले, या सुद्धा उपस्थित होत्या.

प्रथम कार्यक्रमाचे संयोजक लोकप्रशासनशास्त्र विभागाचे  प्रोफेसर डॉ.विठ्ठल जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी शिरूर तालुक्यातील कान्होबाचीवाडी हे गाव संविधान साक्षरतेसाठी दत्तक घेत आहोत असे घोषित केले. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये गावातील प्रत्येक कुटुंबास एक संविधान ग्रंथ देऊन या कुटुंबाने त्याचं वाचन केल्यानंतर त्यांचा साक्षरता सर्वे होणार आहे. याच प्रसंगी प्राथमिक स्वरूपात 40 कुटुंबाला संविधान ग्रंथ वाटप करण्यात आला. त्यानंतर प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांनी प्रत्येक भारतीयांनी संविधानातील अधिकार व कर्तव्य अंगीकारून आपले जबाबदार नागरिकाचे कर्तव्य निभावले पाहिजे असे प्रतिपादन केले. 
त्याचबरोबर गाव संविधान साक्षर होण्यास सर्व गावकऱ्यांनी मदत करावी. व या संविधान साक्षर अभियानात आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. प्रत्येक भारतीयाला किमान स्वतःचे अधिकार व कर्तव्य हे कळालेच पाहिजे भारतीय संविधान हा देशाचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे असे यावेळी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. 
मुख्याध्यापक मिसाळ सर यांनीही संपूर्ण गाव संविधान साक्षर होण्यास माझी शाळा, मुले व पालक हे संपूर्ण सहभाग नोंदवतील असे मत व्यक्त केले. तांबे सरांनी आभार प्रदर्शन मध्ये सातवीच्या मुलांना आपल्या नागरिक शास्त्रातील मानवाचे मूलभूत अधिकार व कर्तव्य याचे वाचन आपल्या पाल्याकडून करून घ्यावे. असे मुलांना आवाहन केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शेवटी कार्यक्रमाचे आभार तांबे सर यांनी मानले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.