आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने घरो घरी तिरंगा मोहिमेंतर्गत “भारत गौरव गाथा

शरद लाटे  64   12-08-2025 16:15:49

Pimpri-Chinchwad स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारकडून सन २०२२ पासून ‘ घरो घरी तिरंगा’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार यंदा देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘घरो घरी तिरंगा’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.

खासदार मेधा कुलकर्णी,सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसदस्य, माजी नगरसदस्या तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील,विजयकुमार खोराटे,तृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुख, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.