प्राचीन काळापासून तूप हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने तुमच्या जेवणाची चव वाढवतेच, पण आरोग्यासाठी भरपूर फायदेही मिळतात. गेल्या अनेक शतकांपासून पारंपरिक भारतीय औषधांमध्येही शुद्धतेचे प्रतीक आणि आयुर्वेदिक पद्धतीमध्ये मुख्य घटक म्हणून तूप किंवा कच्चं लोणी वापरले जाते. तुपाच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या संभाव्य सकारात्मक प्रभावासाठी समकालीन आरोग्य मंडळांमध्ये मान्यता मिळाली आहे.
आतड्याचे कार्य सुधारते
खराब आहार, तणाव, झोपेचा अभाव, बैठी जीवनशैली, या कारणांचा थेट प्रभाव आतड्यांवर पडतो. जर आपण देखील या समस्यांपासून जात असाल तर, तूप खा. नियमित रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आतड्याचे कार्य सुधारते.
पचनसंस्था स्वच्छ करते
रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी आणि मजबूत होते. यासह बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.
चेहऱ्यावर येते चमक
तूप खाईल त्याला रूप येईल, असं म्हणतात ते खोटं नाही. जर आपल्याला नैसर्गिक ग्लो हवा असेल तर, सकाळी तूप खा. नियमित तूप खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि इतर समस्या दूर होतात.
बद्धकोष्ठतेपासून आराम
ज्यांना आतड्यांसंबंधित त्रास आहे, त्यांनी नियमित तूप खावे. यासह ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी देखील सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खावे. यामुळे पचन तर सुधारतेच, व पोट देखील साफ होते.
वजन कमी करण्यास मदत
तूप दीर्घकाळ भूक नियंत्रित ठेवते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे वजन आटोक्यात राहते.
तुपामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के आहेत, यासह अँटीऑक्सिडंट्सने देखील समृद्ध आहे. तूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराचे विविध रोगांपासून सरंक्षण करते.