Amar Kale News देशाच्या राजकीय वातावरण सध्या लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांमुळे तापलेलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूरचे शहाराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनाही दोन कोटी रुपये देवून निवडणूक जिंकण्याची ऑफर देणात आली होती, असा दावा खासदार अमर काळे यांन केला आहे. मात्र संपर्क करणारे कोण होते हे पेठे यांनी सांगितलं नाही. निवडणूक काळात अशी अनेक लोक आमच्याकडे आली होती, असंही खासदार अमर काळे यांनी म्हटलं आहे.
खासदार अमर काळे यांनी जाहीरपणे बोलताना म्हटले की, ''आमच्याकडे सुद्धा लोकसभा निवडणुकीआधी काही लोक आली होती. ते म्हणाले की, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, इतकी-इतकी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. दुनेश्वर पेठे यांच्याकडेही प्रस्ताव आला होता, की दोन कोटी रुपये तुम्ही द्या किती मतांनी तुम्ही निवडून याल हे आम्ही सांगतो आणि तेवढ्याच मतांनी तुम्ही निवडून याल.''
शिवाय, ते राजकीय लोकं नव्हते कोणीतरी मध्यस्ताच्या माध्यमातून आले होते. मात्र या मार्गाने आम्हाला जायचेच नव्हते म्हणून आम्ही त्याच्या खोलात गेलो नाही. इतका पैसा जमवणं शक्य नव्हतं. मात्र ऑफर 100 टक्के आली मलाच नाही अनेक लोकांना आली होती. असंही काळे म्हणाले.