पिंपरी प्रतिनिधी (Pimpri-Chinchwad) पिंपरी-चिंचवड भाजप शहर कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली, दोन महिन्यात झालेल्या सर्व कार्यक्रमाचा आढावा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी घेतला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यशस्वी कार्यक्रमाचा धडाका पक्षाच्यावतीने राबवला आहे,
पुढील काळात संघटनेत मोठे बदल दिसून येतील काही पावले कठोर उचलले जातील पक्ष संघटनेतील पदे हे मिरवण्यासाठी नसून हे जनमानसात जाऊन काम करण्यासाठी पक्षाने दिलेली महत्त्वाची जबाबदारी आहे,
लाभाची पदे मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांची शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी चांगलेच कान टोचले,
पक्षाचे विचार ध्येय दृष्टी पक्ष संघटनेत काम करताना सर्व गोष्टीचा विचार करून संघटनेत रिझल्ट द्यावाच लागतो त्यामुळे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांना संघटनेतील पदाधिकाऱ्यांना कामच करावा लागेल असा सजड इशाराही त्यांनी दिला.