आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अमरावती

CM फडणवीसांच्या डोळ्यात पाणी आले नाही, तर सांगा मनोज जरांगेनी दिले चॅलेंज

नितीन देशपांडे   85   24-07-2025 15:05:13

पुणे (Devendra Fadnavis) manoj Jarange Patil News: परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून, यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमूद आहे.

पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. यावरून पुन्हा एकदा बीडमधील गुन्हेगारीवरून विरोधक टीका करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणावरून आव्हान दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की...

त्या मायमाऊलीला शंभर टक्के न्याय देणार. सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन करतो. एकदा तुम्ही फोटो पाहावेत. महाष्ट्रातील अठरा पगड जातीच्या लोकांना सांगतो, विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो. तुमचा भाऊ असता, तर तुम्ही फक्त फोटो पाहून दाखवा. फडणवीस यांना एकच आव्हान आहे की, कसा न्याय घ्यायचा ते आमचे आम्ही बघू. पण, मीडियासमोर येऊन तुम्ही सांगा की, ते फोटो पूर्ण पाहिले. महादेव भैय्या मुंडेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त फोटो बघावा. त्यांच्या डोळ्यात पाणी आले नाही, असे जर घडले, तर तुम्ही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.