आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 हिंगोली

बाणेर येथे भव्य आधार कार्ड कॅम्प आयोजन

Swati Jain   72   23-07-2025 21:01:37

बाणेर प्रतिनिधी (Aadhar card Camp) आजच्या जच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. सरकारी योजना असो, बँकिंग व्यवहार असो किंवा कोणताही महत्वाचा अर्ज भरायचा असो आधार शिवाय काहीच पुढे सरकत नाही.

आज अनेक कारणांनी लोकांचे मोबाईल नंबर बदलतात. पण आधारशी लिंक केलेला नंबर जर बंद झाला असेल, तर OTP मिळवून आधार पडताळणी पूर्ण करणं अशक्य होतं. मग बँकेतील व्यवहार, पासपोर्टसाठीचे कागदपत्र, सरकारी योजना, किंवा नोकरीसाठीचे अर्ज काहीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळेच, अनेक लोकांना जुन्या नंबरऐवजी नवीन नंबर आधारशी लिंक करायची गरज भासते.

याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर, व भारतीय जनता पार्टीचे गणेश कळमकर व भारतीय टपाल विभाग बाणेर पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमानाने तर आधार कार्ड कॅम्पचे आयोजन केलेले आहे. 

उद्या दिनांक 24 ते 26 जुलै दरम्यान या कॅम्पचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर जनसंपर्क कार्यालय बाणेर येथे आयोजित केला आहे,

🔹 उपलब्ध सेवा

✅ नवीन आधार कार्ड नोंदणी

✅ आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावत करणे

✅ १८ वर्षांखालील मुलांसाठी नवीन आधार नोंदणी

✅ आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.