आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 जालना

अमित ठाकरे घेणार प्रकाश महाजनांची भेट!

शरद लाटे  192   16-07-2025 14:10:12

पुणे प्रतिनिधी :: 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांना पक्षाकडून इगतपुरीत सुरु असलेल्या शिबिराला बोलवण्यात आलं नव्हतं. पक्षाला आपली गरज वाटली नसेल अशा शब्दांत महाजन यांनी यावर नाराजी व्यक्त करत आपल्या मनातील खदखद माध्यमांसमोर बोलून दाखवली होती.

इगतपुरी येथील मनसेच्या शिबिरात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजीच्या विजयी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, तो मेळावा राजकीय नव्हता, तर मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. युतीबद्दल विचारले असता, त्यांनी 'युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता?' असे उत्तर दिले. मात्र, यानंतर काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी तसेच निवडक माध्यमांनी राज ठाकरे बोलले नसतानाही, 'युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल', असे विधान त्यांच्या तोंडी घातले. यावर राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रकाश महाजन म्हणाले, "मला काल रात्री अमित ठाकरे यांचा फोन आला त्यांनी माझं सर्वकाही ऐकून घेतलं. काही गोष्टी मला विचारल्या, काही गोष्टी मला सांगितल्या. मला या गोष्टीचं बरं वाटलं की ते म्हटले मी तुम्हाला भेटायला येतो. पक्षातील तरुण नेते जर आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला सांभाळून घेत असतील त्यांच्याकडं लक्ष देत असतील तर ही आनंदाची गोष्ट आहे. आज सकाळी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र बाळा नांदगावकर यांचाही मला फोन आला होता. माझ्या ज्या काही भावना आहेत त्या मी त्यांना बोलून दाखवल्या, त्यावर आता ते विचार करतील.

'अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या'

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का?"


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.