आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 मुंबई शहर

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या योजना व उपक्रम समाजोन्न्नती करणारे . - सुनील चांदेरे

Swati Jain   27   15-07-2025 19:42:44

बाणेर प्रतिनिधी :: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कासारसाई शाखेचा २६ वा वर्धापन दिन सामाजिक बांधिलकी जोपासत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब बावकर, माजी सरपंच युवराज कलाटे, दत्तात्रय गाढवे, तुकाराम जाधव ,विभागीय अधिकारी सुरेश नांगरे परिसरातील आजी माजी सरपंच, विकास सासायटी आजी माजी चेअरमन , व्हा. चेअरमन,सभासद खातेदार ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते,

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले की जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी बँकेच्या माध्यमातून उद्योग, शेती व्यवसाय, प्रोसेसिंग युनिट योजना आदींवर भर देण्यात येत आहे. प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी बँक सहकार्य करीत आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गौरव होतो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व विचाराने बँकेने मोठी प्रगती केली आहे. म्हणूनच संपूर्ण भारतात जिल्हा बॅंकांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी एक नंबरची बँक म्हणून लौकिक मिळवला आहे. 

कासारसाई शाखेचे सर्व कर्मचारी अधिकारी ठेवीदार खातेदार सर्व सभासदांमुळे कासारसाई शाखा देखील प्रगतीपथावर आहे.  लवकरच नवीन जागेत या शाखेचे स्थलांतर होईल. सर्व सुविधांसुक्त सुसज्ज फर्निचरचे काम करण्यात येईल.  यावेळी  उपाध्यक्ष चांदेरेंनी बँकेचा संपूर्ण लेखाजोखा उपस्थितीत सभासद ग्रामस्थांसमोर मांडला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.