बाणेर प्रतिनिधी :: आधार कार्ड (Aadhar Card) हे प्रत्येकाच्या जीवनातील अत्यावश्यक कागदपत्र. बँकेत खातं उघडायचं असो की महत्त्वाची कागदपत्र मिळवायची असोत, आधारकार्ड लागतंच. त्यामुळे आधारकार्डवर आपलं नाव, जन्मतारीख, पत्ता याची योग्य आणि अचूक माहिती असणं गरजेचं असतं. यात एखादी जरी चूक असेल तरी ती तात्काळ अपडेट (Aadhar Update) करुन घेणंही तितकच गरजेचं. पण नविन आधारकार्ड बनवायचं असेल किंव त्यात माहिती अपडेट करायची असेल तर सरकारी मान्यता असलेल्या केंद्रावरच ती अपडेट करावी लागते मात्र तिथे गर्दीचा सामना प्रत्येक नागरिकाला करावा लागतो, अफाट गर्दी असल्यामुळे व प्रत्येक भागात एक दोन केंद्रच असल्यामुळे स्थानिक नागरिकांना समस्याला तोंड द्यावे लागते.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती चेअरमन बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी दिली यावेळी ते म्हणाले की 14 ते 19 जुलै दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय कमिन्स रोड येथे आयोजन केलेले आहे,
कुठलीही अडचण असल्यास या नंबरला संपर्क करा असे आव्हान चांदेरे यांनी केले आहे
९९६०८०१०१०