निगडी प्रतिनिधी ::- पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटचे विलीनीकरण पुणे महानगरपालिकेत होण्याबाबत बर्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यात आता महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. अशातच पुन्हा दोन्ही कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनीकरण होण्याबाबत चर्चा सुरू होत्या मात्र,
पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये विलिनीकरण राज्य शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरी भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीन करण्याचा निर्णय होऊ शकला नाही.
देहूरोडमध्ये झोपडपट्यांचे असलेले मोठे प्रमाण, रेड झोनचे मोठे क्षेत्र, संरक्षण खात्याची सर्वाधिक जागा यामुळे कॅन्टोन्मेंटचा समावेश करू नये, अशी स्पष्ट भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती. या रेड सिग्नलमुळे देहूरोड कॅन्टोन्मेंटचा महापालिकेत समावेश झाला नसल्याचे महापालिका अधिकार्यांनी सांगितले.
देहूरोडची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 48 हजार 961 आहे. प्रत्यक्षात लोकसंख्या 60 हजारांहून अधिक आहे. मतदार संख्या केवळ 34 हजार आहेत. देहूरोड भागात दहा झोपडपट्या आहेत. क्षेत्रफळ 9 हजार 38 एकर आहे. त्यापैकी 87 टक्के भाग रेड झोनबाधित आहे. त्यामुळे विकासाला कोणतीही संधी नाही.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उत्पन्न अल्प आहे. देखभाल व कर्मचार्यांच्या वेतनावर मोठी रक्कम खर्ची पडत आहेत. त्यामुळे महापालिकेत समावेश केला तरी, देहूरोडसाठी केंद्राने वार्षिक 50 कोटी रुपये दिल्यास महापालिकेत घेण्यास काही हरकत नाही. असा अहवाल महापालिकेने राज्य सरकारकडे सादर केला होता.
याच परिणाम म्हणून राज्यातील इतर कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरी वस्तीचा भाग लगतच्या महापालिकेत समावेश करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. पुणे महापालिकेत पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटचा नागरी परिसर जोडण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.