आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नांदेड

बाणेर परिसरातील प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागणार महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासन

शरद लाटे  201   12-07-2025 08:31:56

पुणे प्रतिनिधी (PMC Development) ::  बाणेर सुस परिसरातील अनेक विकास कामे रखडले गेलेले आहेत, याच पार्श्वभूमीवर बाणेर येथील अंबर सोसायटीतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांच्याकडे आपल्या समस्यांचा पाढा वाचला; त्यांनी देखील सकारत्मक प्रतिसाद देत पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा करत रखडलेल्या कामा संदर्भात कशाप्रकारे समस्यांचे निराकरण करता येईल या संदर्भात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्यासमवेत पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आज महानगरपालिकेचे अधिकारी, अंबर सोसायटीतील रहिवाशी,  व स्थानिक नागरिकांसमवेत बाणेर-सूस हद्दीतील प्रलंबित २४ मीटरचा अपूर्ण डीपी रस्ता, पदपथ, पथदिवे आणि ड्रेनेज विकास कामांची पाहणी केली,

या कामाला लवकरच गती देऊन मार्ग काढला जाईल असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकासह चांदेरे यांना दिला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.