Pune प्रतिनिधी (Manoj Jarange Patil):: 29 ऑगस्ट रोजी मराठा वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली आहे. मुंबईत आरक्षणाचा हुंकार घुमणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले.
दौऱ्यात त्यांनी कारी येथे चावडी बैठक घेतली. या बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटलांनी एक गंभीर आरोप केला. कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात त्यांनी सांगितलं की, संबंधित अधिकाऱ्यांवर कुणबी सर्टिफिकेट देऊ नये असा दबाव मंत्री संजय शिरसाठ हेच टाकत आहेत.
मुंबईचा जाण्याचा मार्ग
आंतरवलीतून 27 ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर नेप्टी नाका मार्गे, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर, मंत्रालय
पर्यायी मार्ग
पैठण,गंगापूर,वैजापूर,येवला,नाशिक, मुंबई