पिंपरी प्रतिनिधी -: पावसाळ्याच्या तोंडावरच व अनेक दिवसापासून प्रलंबित असणारा कुणाल आयकॉन रस्ता हा अद्यावत पद्धतीने विकसित करण्याचे काम प्रकल्प विभागाकडून करण्यात येत आहे, मात्र कामांमध्ये विविध अडचणीमुळे रस्ता कॉंक्रिटीकरणाचा वेग खूप मंदावला गेला आहे याचा परिसरातील नागरिकांना ग्राहक त्रास सहन करावा लागत आहे
या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत;
याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी सदर रस्त्याच्या कामाची पाहणी केली अधिकार्याकडून कामाचा आढावा घेऊन प्रशासनाला तात्काळ सूचना देऊन लवकर रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तात्काळ खड्डे बुजून घ्या
पावसामुळे रस्त्यावर अनेक खड्डे झाले आहेत त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो त्वरित खड्डे बुजून आवश्यक उपाय योजना करा अशा सूचना दिल्या काटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता सुनील पवार,कनिष्ठ अभियंता केतकी कुलकर्णी,टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड कॉर्डिनेटर भीमाशंकर भोसले,इन्फ्राकिंग कन्सल्टंट लीडर पतंगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.