आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 उस्मानाबाद

बाणेर येथील अंबर सोसायटीच्या समस्येवर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढणार - युवा नेते समीर चांदेरे

शरद लाटे  34   10-07-2025 09:44:52

बाणेर प्रतिनिधी -: बाणेर-बालेवाडी  या भागातील वाढती लोकसंख्या, दैनंदिन जीवनातील विविध नागरी सोसायटीतील समस्यावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन सोसायटीच्या नागरिकांच्या वतीने केले होते, समस्येवर चर्चा करण्यासाठी पुणे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले  होते, 

या बैठकीला प्रामुख्याने नागरी समस्येवर चर्चा करण्यात आली पाणीटंचाई, खराब झालेले रस्ते, अपुऱ्या स्वच्छतेची व्यवस्था, पथदिव्यांची समस्या, आणि वाढती सुरक्षा चिंता यांसारख्या अनेक मूलभूत प्रश्नांवर सोसायटी धारकांनी व नागरिकांनी चर्चा केली,

यावेळी स्थानिक प्रशासन व अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते अशी तक्रार देखील त्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्याकडे केली आहे.

यावेळी समीर चांदेरे म्हणाले की अंबर सोसायटी रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात गरज असलेल्या मागण्या आहेत लवकरच त्या संदर्भात पालिका प्रशासनाशी भेटून पत्र व्यवहार करून अंबर सोसायटीच्या रहिवाशांच्या संपूर्ण मागण्या दूर केल्या जातील असे आश्वासन त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना दिले.

पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी चेअरमन बाबुराव चांदेरे व पालिका अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक लावून नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास समीर चांदेरे यांनी दिला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.