आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नागपूर

आयुक्त नवल किशोर राम ॲक्शन मोडवर बाणेर येथील ननावरे चौकाकडे जाणारा 100 मीटरचा डीपी रोड लवकर पूर्ण होणार

शरद लाटे  18859   08-07-2025 21:48:42

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांच्या मागणीला मोठे यश

तेजस कुलकर्णी  (बाणेर प्रतिनिधी) 

पुणे शहरातील (Pune smart City) अत्यंत महत्त्वाचा व स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणारा बाणेरकडे पाहिले जाते, मात्र दिवसापासून बाणेर भागातील हायवेलगतचा पॅनकार्ड क्लब चौक ते ननवरे चौकातील डीपी रस्ता लवकरच पूर्ण होणार आहे,

पॅनकार्ड क्लब रस्ता ते ननवरे चौक दरम्यानचा २४ मीटर डीपी रस्ता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार (Ajit pawar) यांच्या पुढाकाराने आणि पुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांच्या प्रयत्नांमुळे यापूर्वीच पूर्ण झाला आहे. मात्र, ननवरे चौकाला जोडणारा १०० मीटरचा रस्ता अर्धवट राहिल्याने परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना बिटवाईज चौकातून फिरून यावे लागत होते, ज्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे (Samir Chandere) यांनी आज 

यश ऑर्किड सोसायटीचे कमलेशभाऊ काळे, श्रीकांत कंझारकर (रिजेन्सी ओरियन सोसायटी), सूचित आवळगावकर, सुनील गिराम (राहुल अर्कस सोसायटी) आणि उमेश रोडे (यश ऑर्किड) यांसारख्या विविध सोसायट्यांमधील नागरिकांसह पुणे महापालिकेचे आयुक्त किशोर राम यांची भेट घेतली व आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचे काम वेगाने करण्याचे आश्वासन दिले.

यापूर्वी, १७ मे रोजी टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता. त्यावेळी त्यांनी संबंधित महानगरपालिका (Pune mahapalika) अधिकाऱ्यांना रस्त्याचा विषय मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर कळमकर चौक, मुरकुटे गार्डन चौक आणि बिटवाईज कंपनी चौक येथील वाहतूक समस्या संपुष्टात येईल आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. या महत्वपूर्ण कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम (

Naval Kishore Ram PMC commissioner) आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. बाबुराव  यांचे परिसरातील सोसायटी व नागरिकांकडून आभार मानण्यात आले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.