आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

Raj Thackeray राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Swati Jain   111   07-07-2025 09:07:33

Mumbai:: Raj Thackeray And Uddhav Thackeray : महाराष्ट्राचं अख्खं राजकारण ज्या नावाभोवती घोंगावतं ते नाव म्हणजे ठाकरे. तेच ठाकरे बंधू आता 2 दशकानंतर एकाच फ्रेममध्ये दिसले आणि महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे पर्वाला सुरूवात झाली.

मुख्य माध्यम तसेच सोशल माध्यमांमध्ये व्यक्त होण्यापूर्वी बोलण्यापूर्वी राज ठाकरे यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मनसे पदाधिकारी प्रवक्त्यांना राजकीय प्रतिक्रिया मत, प्रदर्शन करताना राज ठाकरेंची परवानगी घ्यावी लागणार आहे. विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्या प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

विजयी मेळाव्यात दोन्ही भावांची देहबोलीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची देहबोली कशी असेल याची उत्सुकता होती. ही उत्सुकता फक्त राजकीय अभ्यासकांना नव्हती. तर ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी आशा लावून बसलेल्या सामान्य शिवसैनिक आणि मनसैनिकांची होती. विजयी मेळाव्यासाठी जेव्हा उद्धव ठाकरे वरळीत पोहचले तेव्हाच त्यांच्या चेह-यावर हास्य होतं. कोणताही तणाव त्यांच्यात नव्हता. त्यांचं स्वागत बाळा नांदगावकरांनी केलं तेव्हा त्यांचा चेहरा त्यांच्या मनातला आनंद सांगत होता.

एप्रिलमध्येही राज यांनी दिलेल्या सूचना

राज-उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा एप्रिल महिन्यात सुरू झाल्या होत्या. या चर्चा सुरू झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुट्टीसाठी परदेशी गेले होते. त्यावेळी मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षातील युतीबाबत मनसे नेत्यांकडून विरोधात वक्तव्य केली जात होती. त्यावेळी देखील राज यांनी परदेशातून सूचना करत या मुद्यावर न बोलण्याची तंबी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.