आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे ग्रामीण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या समवेत यंदा 'या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

शरद लाटे  112   06-07-2025 08:33:43

Pandharpur: महाराष्ट्रातून लाखो वारकरी, भक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहे. एकादशी वारकऱ्यांसाठी सण असतो.

विठ्ठल दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूर मध्ये पोहचले आहेत. पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल महापूजा संपन्न झाली. यावेळी मानाच्या वारकऱ्याचा मान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याला मिळाला. दामू उगले आणि कल्पना उगले हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले.

गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी नाशिक जिल्ह्यातूनच निवडला गेलाय. विठ्ठलाचं दर्शन रांग बंद करतेवेळी रांगेमध्ये उभे असणार्‍या प्रथम दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून मान मिळतो.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्रविठल रुख्मिणी आराध्य दैवत आहे. पांडुरंगचा आशीर्वाद मिळत राहो. पांडुरंग मनातला ओळखणारा आहे, राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा अशी प्रार्थना करतो.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.