Police Bharti 2025 : मुंबई : पोलीस बनण्याचे होण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक तरुण भरती प्रतीक्षा करीत असतात. पोलीस बनण्यासाठी नियमित सराव करताना तरुण नजरेस पडत असतात. ऑक्टोबरमध्ये 10 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या भरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलिस भरती केली जाणार आहे. यानंतर १० हजार पोलिसांची निवड केली जाईल.
सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत बँड् समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार देखील असणार आहेत. उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकाच अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क १ हजार रुपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे.