पुणे प्रतिनिधी (Radhakrishna vikhe patil) महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून येत्या काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचे महत्व आणि आवश्यकता वाढणार आहे.
तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था आणि राज्य शासनाच्या जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1008 कोटी रुपयांच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांतून (पंप स्टोरेज) 240 मेगावॅट वीजनिर्मिती होणारा सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यातील सहकारातील हा पहिलाच प्रकल्प असून तो कोदाळी धरण (ता. चंदगड) आणि केंद्रे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे साकारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे मंगळवारी केली. या प्रकल्पातून 300 जणांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई येथे विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात हा सामंजस्य करार झाला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. डॉ. विनय कोरे, नवशक्तीचे अध्यक्ष एन. एच. पाटील, ज्योतिरादित्य कोरे उपस्थित होते.