आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 भंडारा

Mumbai MHADA च्या या सदनिकांकडे खरेदीदारांची पाठ; नेमकं कारण काय?

नितीन देशपांडे   74   30-06-2025 11:50:52

मुंबई प्रतिनिधी (Mumbai news) MHADA Homes Latest Update : मुंबईत हक्काच्या घर खरेदीसाठी अनेक मंडळी दिवसरात्र मेहनत करतात. पैन् पै जोडून घरासाठीची रक्कम जुळवली जाते. आर्थिक जुळवाजुळवीच्या या गणितांमध्ये अनेकांनाच म्हाडाचा हातभारही लागतो.

मुंबई सोडतीची प्रतीक्षा, मग प्रतिसाद इतका कमी?

 

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीनं कायमच सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यातही मुंबईच्या हृदयात अर्थात ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील महागडी घरंसुद्धा यामध्ये चर्चेचा विषय. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ही घरं म्हाडाच्या मुंबई मंडळाला सोडतीसाठी उपलब्ध करून देण्याचआली. म्हाडाने पहिल्यांदा 2023 च्या सोडतीत यातील सात घरांचा समावेश केला.

 

घरांच्या किमती कोट्यवधींमध्ये...

 

रिअल इस्टेट क्षेत्रात 'मार्केट व्हॅल्यू'नुसार या घराची किंमत सुमारे 12 कोटी असली तरी म्हाडाच्या दरानुसार ही किंमत 7 कोटी 52 लाख ते 7 कोटी 57 लाखांदरम्यान ठेवण्यात आल्या होत्या. दर कमी करुनही घरांची विक्री न झाल्यानं सोडतीत सहा घरांचा समावेश करण्यात आला आणि घरांच्या किमती कमी करून त्या 5 कोटी 34 लाख ते 6 कोटी 77 लाखांदरम्यान आणण्यात आल्या. मात्र तरीही खरेदीदारांनी या घरांना अपेक्षित प्रतिसाद दिला नाही.

 

घरांच्या किमती कमी होण्याचे संकेत?

 

मुंबईतील ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये असणाऱ्या कोट्यवधींच्या घरांची विक्री करायची कशी, हाच प्रश्न सध्या म्हाडापुढे उपस्थित होत असून, या घराच्या किमती आणखी कमी करून दिवाळीत येणाऱ्या मुंबई मंडळाच्या लॉटरीतही त्यांचा समावेश केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तीन वेळा सोडतीत समावेश करूनही या घरांना प्रतिसाद न मिळाल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर या घरांची विक्री केली जाऊ शकते, अशीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं आगामी काळात येणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळांच्या सोडतीवर अनेकांचच लक्ष असेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.