आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे ग्रामीण

मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील

Swati Jain   23   29-06-2025 11:40:19

Pune 

Chandrakant Patil News: मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात आता मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा निघणार आहे. या दोन्ही पक्षांनी यापूर्वी जाहीर केलेल्या तारखा बदलण्यात आल्या असून, आता हा मोर्चा ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा काढण्यात येणार आहे.

काँग्रेस आणि शरद पवार गट हेही मोर्चात सहभागी होणार आहेत. हिंदीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतैक्य दिसत आहे. त्याचवेळी सत्तारुढ महायुतीत मतैक्याचा अभाव असल्याचे चित्र आहे. मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

देशामध्ये ५५ टक्के लोकसंख्या हिंदी भाषिक आहेत, ज्या मुंबईत राहतो, त्यात दीड कोटी लोक अमराठी आहेत. त्यांच्याशी बोलताना हिंदी हवी की नको? हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. इंग्रजी चालते, पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा

सरकार वारंवार असे म्हणते आहे की, आम्ही हिंदीची सक्ती करत नाही. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पंतप्रधान मोदी आग्रह धरला की, शिक्षण हे मातृभाषेतून मिळायला पाहिजे. आपल्याला आपली मुले महाराष्ट्रातच राहावी असे वाटत असेल, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पहिलीपासून इंग्रजीही सक्तीची नको, कारण ती विद्यार्थ्यांना झेपत नाही. झेपण्याचा विषय असेल तर ओके? हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. माझ्याकडे सगळ्यांचे रेकॉर्ड्स आहेत. उद्या यादी जाहीर करणार आहे की, कोणाची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकली, यादीच देतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आपण जर्मन, फ्रेंच शिकवायला तयार आहोत, मग एवढा हिंदीचा विरोध कुठून आला? दादांना राज ठाकरेंकडे पाठवले, त्यांना त्रिभाषा धोरण काय आहे, हे समजावून सांगितले. हा त्रिभाषा फॉर्म्युला उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला आहे. हा ते वाचत नसतील. तुम्हाला सरकार जास्त दिवस चालवायला मिळाले नाही, त्यामुळे तो रिपोर्ट आम्ही अंमलात आणत आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणालेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.