Mumbai -(MNS )
ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळी मराठी माणसासाठी सर्वात पहिले पाऊल राज ठाकरे (Raj Thackeray) उचलतील आणि काल तसेच काही घडलं. राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता, दोन मोर्चा काढण्यापेक्षा एकच मोर्चा काढून आणि तो मराठी माणसाच्या हितासाठी असेल मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवू.
न भुतो न भविष्यती असा कधीही महाराष्ट्रात झालेला नसेल एसा मोर्चा काढू, असे म्हणत मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी या मोर्चाला विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. याला मराठी माणूस जाम चोपेल, आमची भाजपला विनंती आहे की, त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी, असा शब्दात त्यांनी इशाराही दिला आहे.
सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली. एवढीच हिंमत असेल तर जा ना तिकडे साऊथमध्ये. तू स्वत:ला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडं जाऊन विरोध करुन दाखव. सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. मी खात्रीने सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल. आमची भाजपला विनंती आहे की, याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर याच्या तोंडात दात नसतील, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे.