आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पिंपरी -चिंचवड

नेवाळे वस्ती येथील Birds International School कडे जाणाऱ्या रस्त्यावर अपूर्ण स्ट्रॉम वॉटर लाईन कामामुळे होणाऱ्या त्रासाबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी : दिनेश यादव

शरद लाटे  45   26-06-2025 09:18:27

पिंपरी चिंचवड : नेवाळे वस्ती येथील Birds International School कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एप्रिल २०२५ पासून स्ट्रोम वाँटर लाईनचे काम सुरू आहे. परंतु, सदर काम अजूनही अपूर्ण असून, यामुळे परिसरातील रहिवाशांना आणि विशेषतः शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे निवेदन फ प्रभाग, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभागाला देण्यात आले आहे.

🛑 रस्त्याची संपूर्ण खोदाई झालेली असून,
🛑 पावसामुळे पाणी साचत आहे,
🛑 अपघात होण्याचा धोका वाढला आहे,
🛑 लहान मुलांना शाळेत जाताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.

नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कृपया या कामाला तातडीने गती देण्यात यावी, ही नम्र विनंती.

  1. सदर कामाचे वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
  2. ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस दिली जावी.
  3. रस्त्यावर तात्पुरती सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी.
  4. अपघात टाळण्यासाठी प्रकाश, चेतावणी फलक, बॅरिकेड्स लावण्यात यावेत.

अशी मागणी स्वी. नगरसेवक दिनेश लालचंद यादव, प्रभाग – फ, नेवाळे वस्ती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी केली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.