Kolhapur shinde shivsena (Pcmctahalka.in)
कोल्हापुरातील माजी उपमहापौरांसह २३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रात्री मुंबईत त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं.
मुंबईतील मुक्ताई बंगल्यावर रात्री आठच्या सुमारास हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय समजल्या जाणारे शारंगधर देशमुख यांच्यासह महत्त्वाचे माजी नगरसेवक शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
कोल्हापूरातील माजी महापौरांसह २३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडीला खिंडार पडलं आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसपेक्षा भाजप ताराराणी आघाडीतून जास्त आउटगोइंग सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय गोटात जोरदार हालचाली सुरू आहे. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरमध्ये आता शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.