वर्धा प्रतिनिधी- (Devendra Fadnavis )२५ जून १९७५ ची ती काळी रात्र. घरात जोरात फोन ठेवण्याचा आवाज येतो. चंद्रपूरच्या कलेक्टरचा फोन होता. त्यांनी बुलढाण्याचे कलेक्टर अण्णासाहेब फडणवीस यांना त्यांच्या बंधू गंगाधरराव यांना अटक झाल्याची माहिती दिली. फोन ठेवून अण्णासाहेब आपल्या मुलाला, संजयला आवाज देतात. रात्री १२ वाजता वडिलांचा आवाज ऐकून घाबरलेला संजय त्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतो. वडिलांचा चिंताग्रस्त चेहरा बघून त्याला काहीतरी अघटित घडल्याची चाहूल लागली. तितक्यात वडिलांनी सांगितलं, "आताच्या आत नागपूरला निघ!" संजय काही बोलणार, इतक्यात ते पुन्हा बोलले, "गंगाधररावांना मिसाच्या नावाखाली अटक झाली आहे. सरिताजवळ मोठं कोणी नाहीये, तुला जावं लागेल." आणि संजय त्वरित नागपूरला जाण्यासाठी निघाला.
नागपूरला मध्यरात्री गंगाधरराव यांना अटक झाली होती. रात्रीच्या काळोखात, आपल्या वडिलांना अटक होताना पाहत होता एक पाच–सहा वर्षांचा देवेंद्र. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान गोठवून विरोधकांना तुरुंगात डांबलं जात होतं. स्वातंत्र्याचा आवाज दडपला जात होता. त्यावेळी देवेंद्र इंदिरा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होता. आपल्या वडिलांना ज्यांच्या सांगण्यावरून तुरुंगात टाकण्यात आलं, त्याचं नाव त्याच्या शाळेला होतं. हा विरोधाभास लक्षात आल्यावर देवेंद्रने आईला सांगितलं, "मी इंदिरा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाणार नाही!" इंदिरा हे नाव त्याला अन्यायाचं प्रतीक वाटत होतं. हा निर्णय फक्त शाळा सोडण्याचा नव्हता; हा आपल्या वडिलांप्रती निष्ठेचा आणि अन्यायाविरुद्ध बंडाचा होता. देवेंद्रच्या निर्णयाचं आईला कुतूहल वाटलं. सहा वर्षांच्या मुलाला होणारा अन्याय समजत होता. त्याची देशभक्ती बघून आईला अभिमान वाटला. आणि त्याचा सरस्वती विद्यामंदिर येथे प्रवेश झाला, जिथे त्याच्या कुटुंबातील धैर्य, देशभक्ती आणि मूल्यांशी सुसंगत वातावरण होतं.
बंडाचं हे कृत्य एक ठिणगी होती, जी पुढे एका असामान्य नेत्याच्या उदयाची नांदी ठरली. आणीबाणी हा भय आणि दडपशाहीचा काळ होता, पण याच काळाने अप्रत्यक्षपणे एका नायकाला जन्म दिला. वडील तुरुंगात असताना स्वतः उचलेलं धाडसी पाऊल याने देवेंद्रच्या मनात सत्ता, जबाबदारी आणि योग्य गोष्टींसाठी उभं राहण्याची समज वाढवली.
यावेळी सुरेश भट यांच्या कवितेतील ओळी आठवतात —
उभा देश झाला आता एक बंदीशाळा,
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला,
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली,
अरे, पुन्हा एकदा आयुष्यांच्या पेटवा मशाली.
या ओळींप्रमाणे, आणीबाणीच्या अंधारात देवेंद्रच्या मनात एक मशाल पेटली. त्याला नैतिक दिशा मिळाली, जी त्याच्या पुढील आयुष्यात आणि राजकीय कारकीर्दीत त्याचा मार्गदर्शक ठरली. पाच वर्षांच्या त्या लहान मुलाने, ज्याने अन्यायाविरुद्ध आपला आवाज उठवला होता, त्याचं पुढे एका प्रखर आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यामध्ये रूपांतर झालं.
लहान मुलाच्या शांत बंडापासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत येऊन पोहोचला. आणि आज देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात राज्य करणारं नाव बनलं.
#SamvidhanHatyaDiwas #maharashtra #DevendraFadnavis4Maha #आणीबाणी